कर्ज पास होण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या !!!

746

या धकाधकीच्या जिवनात माणसाला कधीही पैशाची गरज पडू शकते. अशा वेळी नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींना उधार मागण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. मात्र त्यांच्याकडून मदत मिळेल याची खात्री नसते. अशा वेळी कर्ज हा एकमेव पर्याय आपल्यासमोर उरतो. कर्ज काढण्याासाठी आधी आपल्याला अर्ज करावा लागतो.

बँक अर्ज केल्यानंतर सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पडते. आता आपलं कर्ज मंजूर होणार या विचारात आपण असतो. मात्र अचाननक कळतं की कर्जाचा अर्ज नाकारला गेलाय. याची कारणं शोधत राहता तुम्ही. कर्ज नाकारण्याची अनेक कारणं असतात. जाणून घेऊया का नाकारलं जातं कर्ज

कर्ज मंजूर करण्यासाठी चांगलं बँकेशी आर्थिक वर्तन हा अनेक बँकांचा निकष असतो. व्यवहारांवरून तुमचं व्यक्तिमत्त्व जोखलं जातं. आर्थिक व्यवहार कसे हाताळता याकडे बँका लक्ष देतात. यावरून तुम्ही किती जबाबदार आहात हे कळू शकतं.
बँकेतल्या खात्यात बर्‍यापैकी शिल्लक असू द्या. सगळे व्यवहार चोख असू द्या. बँक व्यवहारांची छापील माहिती असू द्या. पासबुक नियमितपणे भरून घ्या.

तुम्ही दिलेले कोणतेही चेक परत जाणार नाहीत याची काळजी घ्या.
इतर कर्जं घेतली असतील तर हप्ते वेळेत भरा. हप्ता चुकवू का.
रोख रकमेशी संबंधित व्यवहारांचं प्रमाण र्मयादित किंवा कमी असू द्या. खात्यातून मोठय़ा प्रमाणावर रोख रक्कम काढू नका.

क्रेडिट कार्डचा वापर सावधपणे करा. कार्डवर भरपूर खर्च करू नका.
भाड्याच्या घरात राहात असाल तर कागदपत्रं व्यवस्थित ठेवा. करार करा.

नोकरदार असाल तर पगाराशी संबंधित सगळी माहिती बँकेला द्या. पगार बँक खात्यात जमा होत असल्याची खात्री करून घ्या. कर्जासाठी अर्ज करण्याआधी संस्थेत कमीत कमी सहा महिने काम करणं गरजेचं आहे.
एक नोकरी सोडल्यावर दुसरी मिळेपर्यंत बराच कालावधी लागला तर बँका कर्ज नाकारू शकतात.