सततच्या तोंड येण्यापासून मिळवा सुटका असे करा घरगुती उपाय..

5274

चला आज आम्ही तुम्हाला यावरील घरगुती उपाय सांगणार आहोत.

तोंडात फोड आल्याने काही सुचेनासं होतं. खाणं दूरच पाणी पिणंही कठिण होऊन बसतं. यावर नेमका काय उपाय करावा हे मात्र अनेकांना माहितीच नसतं. पण यावरील उपाय तुमच्या आसपासच असतात. तोंड आलं की, तोंडाच्या आत आणि जिभेवरही फोड येतात. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो. चला आज आम्ही तुम्हाला यावरील घरगुती उपाय सांगणार आहोत.

तोंड येणं ही एक साधारण बाब झाली आहे. अनेकदा तिखट खाल्ल्यानेही जिभेवर, तोंडात, ओठांवर फोड येतात आणि पाच ते सात दिवस हा त्रास होत राहतो. कधी कधी तर हा त्रास जास्त दिवसही होतो. त्यामुळे ना धड जेवता येत ना पाणी पिता येत. कधी कधी तर यातून रक्तही येतं. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक आवश्यक असतं.

तोंड येण्याची मुख्य कारणे
जास्त मलासेदार पदार्थ खाणे
जास्त गरम पदार्थ किंवा ड्रिंकचे सेवन करणे
दातांची निट स्वच्छता न करणे
जास्त अ‍ॅसिडिक पदार्थांचं सेवन करणे
शरिरात व्हिटॅमिन बी आणि आर्यनचे संतुलन ठिक नसणे
अ‍ॅलर्जी असलेल्या पदार्थांचं सेवन करणे

कधी कधी थोडा ताप आल्यावरही तोंड येतं. महिलांना मासिक पाळी दरम्यानही तोंडाला फोड येतात. तणाव असल्यानेही तोंडात फोड येतात. तोंड आल्यानंतर तुम्हाला दातांच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं.
तोंड आल्यावर काय घरगुती उपाय कराल?
१) एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ घाला आणि हे पाणी तोंडात थोडा वेळ ठेवा. हे दिवसातून दोन तिनदा करा. याने थोडी जळजळ आणि त्रास होईल, पण तोंडाचे फोड लवकर बरे होतील.

२) तोंडात फोड आल्यावर तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या.

३) खायच्या पानचं चूर्ण तयार करा. त्यात थोडं सहद मिसळून त्याचा चाट्न तयार करा. त्याने फोड लवकर बरे होतील.
४) खायच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप घालून ते फोडांवर लावा, त्याने लवकर आराम मिळेल.

५) लिंबूच्या रसात मध मिसळून त्याने गुळना केल्यास आराम मिळतो.

६) जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या, याने पोट साफ होईल आणि तोंडाला आराम मिळेल.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: VipMarathi.Me. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा:
Facebook.Com/VipMarathi.Me
Copyright (c) 2017 VipMarathi.Me All rights reserved.