कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार !

3162

नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने विळखा मारला की, जिवाला धोका असतो, हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल. उन्हाळा सुरू झाला की, वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते. लहानपणी ज्या व्यक्तींना कांजिण्या होतात, त्या रुग्णांमध्ये हे विषाणू मज्जारज्जूमध्ये सूप्त रूपात कायम वास्तव्य करतात. एकदा कांजिण्या झाल्यावर पुन्हा होत नाहीत. काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सूप्त असलेले विषाणू परत जागृत होतात आणि त्या व्यक्तीला नागीण होते. प्रतिकार शक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत.नागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.जोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. कः लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.

कांजिण्यांच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काहींच्या शरीरात हे विषाणू तसेच राहिलेले असतात. काही वर्षानंतर हे विषाणू चेताराज्जुतून नसेतून पसरतात व त्वचेवर फोड तयार होतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची तीव्रता वाढते. म्हातारपणात नागिणीचा त्रास जास्त होतो. चेतातंतूच्या रेषेवर विषाणूंची वाढ होते, या जागेवर सुरुवातीला खूप वेदना होतात. नंतर तिकडची त्वचा लाल होते व फोडपण येतात. काही दिवसानंतर फोडांवर खपल्या धरतात. हे फोड नष्ट झाल्यानंतर वेदना थांबतात. काही वेळा वेदना काही काळ राहतात. याचे वाईट परिणाम तर होत नाहीत पण जर फोड डोळ्यात येत असतील तर नजर जाऊ शकते.

उपचार
या आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे.

काही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.

नागपंचमी. या नावाशी साधम्र्य असणारा आजार म्हणजे ‘नागीण’. जसे या सणाबद्दल काही गैरसमज समाजात प्रचलित आहेत, त्याचप्रमाणे या आजाराबद्दलही आहेत. नागिणीचा पूर्ण वेढा पडला, उतरलेली नागीण पूर्ण गोल झाली, तिची दोन्ही टोके जुळली की, माणूस मरतो इत्यादी अनेक गैरसमज ऐकायला मिळतात. नागाला जसे दूध, अंडे दिले जाते तसेच नागीण या आजारावर लेपासाठी अंडय़ाचा व गेरूचा वापर केला जातो, काही ठिकाणी तर वारुळाची माती लेपासाठी वापरली जाते. खरंच या नागाचा आणि नागीण या आजाराचा काही संबंध आहे का?

आयुर्वेदात नागीण या आजारालाच ‘विसर्प’ असे म्हटले आहे. विसर्प म्हणजे सापाप्रमाणे ज्याची गती आहे असा आजार. हा एक प्रकारचा त्वचारोग आहे, मात्र पित्त वृद्धी झाल्याने हा होतो असे आयुर्वेदीय मत. आधुनिक मतानुसार यास ‘हर्पिझ झोस्टर’ असे म्हणतात. हे एक वायरल इन्फेक्शन आहे. मज्जातंतूंच्या मार्गाप्रमाणे हा आजार पसरत जातो. थोडक्यात आजार वाढला म्हणजे जास्तीतजास्त ‘नर्व रूट’ या आजाराने व्यापली जाते व नर्वचा मार्ग पूर्ण झाला म्हणजे गोल विळखा पडला तर आजार अधिकच वाढल्याने माणूस दगावण्याची शक्यता वाढते म्हणून हा गैरसमज पसरला आहे. हा संपूर्ण शरीरावर कोठेही होऊ शकतो. तरीही चेहरा, छाती, पोट, हात या ठिकाणी हा अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्या शरीराची खालावलेली व्याधीप्रतिकारक शक्ती व वाढलेल्या पित्ताचे द्योतक म्हणजेच जणू काही नागीण. रात्री सतत जागरण करणे, पित्तवर्धक आहार सेवन करणे, वेळी अवेळी जेवण करणे या सर्व कारणांनी आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली व पित्त वाढले की व्यवहारात नागीण झालेले रुग्ण पाहायला मिळतात. प्रचंड दाह व खाज असते. रुग्ण अगदी हैराण झालेला असतो. काहीही केल्या ही खाज कमी होत नाही. आधुनिक शास्त्रात यावर ‘असायक्लोवीर’ नावाच्या औषधाची फार उपयोगी उपाययोजना आहे, याने आजार तत्काळ बरा होतो मात्र कित्येक जणांना पुढे कित्येक वर्ष नागीण बरी होऊनसुद्धा त्या ठिकाणी आग व खाज जाणवत राहते. म्हणून हा आजार बरा करताना आपण आयुर्वेदीय मतसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

जोपर्यंत शरीरातील वाढलेले पित्त व दूषित रक्त बाहेर पडत नाही तोपर्यंत हा आजार खऱ्या अर्थाने बरा झालाय असे म्हणता येत नाही. म्हणून आयुर्वेदात यावर जलौकावचरण, रक्तमोक्षण इत्यादी रक्त व पित्ताच्या शुद्धीचे उपचार सांगितले आहेत. यानेसुद्धा रुग्णाचा दाह व खाज तात्काळ कमी होते. काही पित्तशामक लेप व विरेचनासारखे पंचकर्मातील उपचारसुद्धा या आजारापासून कायमची मुक्ती देतात. आज्जीबाईच्या बटव्यातील तांदळाच्या पिठाचा लेप दुर्वामध्ये खलून केल्यास नागीण पसरत नाही व दाहसुद्धा शांत होतो. मात्र काही घरगुती लेप जरी उपयुक्त असले तरी सध्याच्या काळी प्रकारानुसार डॉक्टरांच्या व वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार करणेच योग्य ठरेल.

लक्षात ठेवा काही आजारांची नावे ही त्यांच्या गतीनुसार, स्थानानुसार अथवा लक्षणानुसार दिली जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याचा थेट एखाद्या प्राण्याशी संबंध असेलच असे नाही. म्हणून नागीण झाली म्हणजे तुम्ही एखादा नाग मारला असेल, नागिणीने डाव धरला असेल अथवा आता नागाची पूजा केली तरच हा आजार बरा होईल या सर्वच अंधश्रद्धा आहेत.