ऐश्वर्या रायला लागली आहे ही वाईट सवय, ज्यामूळे बच्चन परिवाराचे खर्च होतात करोडो रुपये..!

3055

मुंबई- ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबाची सून होण्याआधी विश्वसुंदरीचा किताब जिंका होता आणि अनेक बॉलीवुडच्या गाजलेल्या चित्रपटातही काम केले. ४० पेक्षा जास्त वयाची सगळ्यात लहान ऐश्वर्या आजही बॉलीवुच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याने तिने बॉलीवुड च्या बरोबरीनेच हॉलीवुडमध्येही एक खास असे स्थान मिळवले आहे. ऐश्वर्याने अनेक हॉलीवुड चित्रपटात काम करून नाव कमावले. कधीतरी ऐश्वर्याच्या सौंदर्याचे तिच्या अभिनयापेक्षा जास्त कौतुक होते. आजही सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्याचेच नाव सगळ्यात पहिले घेतले जाते.

बॉलीवुडमध्ये केले जबरदस्त पुनरागमन

अभीषेक बच्चन बरोबर जेव्हा ऐश्वर्याने लग्न केले आणि त्यानंतर जेव्हा ती आई झाली तेव्हा बॉलीवुडच्या व इतरही लोकांनी हे मान्य केले कि आता कदाचित ती चित्रपटात दिसणार नाही. प्रेक्षकांना हेही वाटू लागले कि ऐश्वर्या लग्न झाल्यानंतर चित्रपटांपासून अंतर ठेवेल पण ऐश्वर्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि सगळ्यानांच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. तिने ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये ज्या प्रकारची बोल्ड भूमिका डेली त्यांनतर तर कोणाचा विश्वासच बसला नाही कि ऐश्वर्या लग्न झालेली आहे आणि एका मुलीची आईसुद्धा आहे.

स्वतःला अशी फिट ठेवते ऐश्वर्या

लग्न झाल्यानंतर आणि एका मुलीची आई झाल्यानंतर लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती ऐश्वर्या आता पूर्वीसारखी फिट राहू शकेल. सगळ्यांना असेच वाटत होते कि आता तिचे वजन खूप वाढेल. पण आश्चर्याची गोष्ट अशी कि ने सगळ्यांना गुंगारा देत पुनरागमन केले. नेहमी असे पाहिले जाते कि गरोदरपणात महिलांचे वजन खूप वाढते आणि अशातच ऐश्वर्याचे अचूक बारीक असणे हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. आता प्रश्न असा आहे कि नक्की तिने असे काय केले कि ती इतक्या लवकर स्वतःला फिट करू शकली.

आयुर्वेदिक तेलाने ऐश ने केले स्वतःला फिट

वास्तविक मुंबई मिररने आपल्या एका अहवालात असा खुलासा केला आहे कि ऐश्वर्याने गरोदरपणानंतरच ऑनलाइन टोनिंग ऑयल (तेल) मागवायला सुरुवात केली आहे. वृत्तपत्रातील रिपोर्ट असे सांगतो कि ” ऐश्वर्याने स्वतःला बारीक ठेवण्यासाठी एक टोनिंग ऑयल (तेल) मागवले आहे. ऐश्वर्या अनेक वर्षांपासून या आयुर्वेदिक स्लिमिंग तेलाचा वापर करत आहे. प्रत्येक चित्रपटाच्या आधी ती हे तेल केरळवरून मागवते.” वृत्तपत्राच्या या खुलाश्यानंतर सगळ्यांना हे समजले कि ऐश्वर्याने स्वतःला कसे फिट ठेवले आहे, रिपोर्टनुसार, हे तेल खूपच महाग आहे.