जगातील एक आश्चर्य, ‘ताज महल’ बद्दल जगाला माहीत नसलेल्या १० गोष्टी.!

1093

हो आपल्याला माहीत आहे ‘ताज महाल’ जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे. हो आपल्याला माहीत आहे ताज कोणी बांधला, कोणासाठी बांधला. हो, ताज महाल भारताची शान आहे, जगभरातील हजारो लोक रोज ताज महाल पाहण्यासाठी येतात. आपल्याला ताज बद्दल बरच काही माहीत आहे. पण या लेखामद्धे आपल्याला अश्या काही वाचायला मिळतील ज्याबद्दल आपण कधी ऐकले सुद्धा नसेल.

हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या.

१) ताज महाल च्या मुख्य मनोर्‍याला असलेले छेद.

तुम्ही ताज महाल ची एक गोष्ट ऐकली असेल, ज्यामधे असे संगितले आहे की शहाजहान सर्व मजुरांचे हात कपात असलेला पाहून एक कारागीर मनोर्‍यावर गेला आणि त्याने मुख्य मनोर्‍यावर एक छेद केला ज्याने पावसाचे पाणी पाझरुन मुमताज च्या कबरवर पडते.

पण हे कितपत योग्य आहे याचा पुरावा देणे कठीण आहे. हो, ताजमहाल च्या मुख्य मनोर्‍यातून पानी पाझरते, त्याचे कारण वेगळे आहे. प्रत्येक पावसाळ्यात पाणी गळत नाही आणि ते मुमताज च्या कबरवर सुद्धा पडत नाही.

वरील ताज महाल च्या फोटो मध्ये स्पष्ट दिसते की मनोर्‍यांमद्धे एक पोकळी आहे, वातावरणातील बदल, लोकांच्या गर्दीमुळे वाढती आर्द्रता, आणि इतर कारणांमुळे रसायनिक अभिक्रिया होऊन पाण्याची गळती होते.

२) जेंव्हा ताज महाल झाकून ठेवला.

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी सर्वात मोठे मानवनिर्मित आश्चर्य झाकून ठेवण्यात आले होते. पुढे अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतरही ताज महालवर हिरवा कपडा झाकण्यात आला होता.

३) शहाजहान ने सर्व कारागिरांचे हात कापले?

तुम्ही लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवता? आता वाचा सत्य. ताज महाल ज्यांनी बांधला त्यापैकि बरेच कारागीर पुढे ‘लाल किला’ बांधण्यासाठी हजर होते.
”उस्ताद अहमद लाहौरी” हे ताज महालचे मुख्य आर्किटेक्ट होते, त्यांनीच लाल किल्ला सुद्धा बांधला.

४) ताज महाल बांधण्यासाठी लागलेला वेळ

ताज महाल बांधून पूर्ण करण्यासाठी तब्बल २२ वर्ष लागले. २२,००० मजूर दिवस-रात्र कष्ट करत होते. १६५४ मध्ये ताज महाल चे बांधकाम पूर्ण झाले.

Taj Mahal in India

५) ताज महाल बांधण्यासाठी झालेला खर्च

ताज महाल बांधण्यासाठी त्या काळी जवळपास ३ कोटी २० लाख रुपये इतका खर्च झाला होता.

६) ताज महलला भेट देणारे पर्यटक

दररोज जवळपास १२ हजार पर्यटक ताज महालला भेट देतात.हे जगात सर्वात जास्त भेट दिली जाणारे स्थळ आहे.

७) भूकंपाने पडझड होणार नाही याची काळजी

ताज महाल च्या मुख्य इमारती-शेजारील चार स्तंभ हे बाहेरच्या दिशेने झुकलेले दिसतात. भूकंपामुळे ताज महाल च्या मुख्य इमारतीचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून घेतलेली ही काळजी.

८) यमुना नदीमुळे ताज महाल टिकून आहे. 

ताजमहाल चा पाया हा Ebony wood पासून बनवलेला आहे. लाकूड हे जास्त काळ टिकून राहणारी वस्तु नाही. वेळेसोबत लाकूड कमकुवत होते पण ताज महाल च्या शेजारून वाहणार्‍या यमुना नदीमुळे पाया मजबूत आहे. Ebony wood मजबूत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. ” यमुना नदीमुळे ” ताज महाल आजही ऊभे आहे हे म्हणणे चूक ठरणार नाही.

९) रंग बदलू ताजमहाल!

सकाळी गुलाबी दिसणारा ताजमहाल रात्री दुधासारखा पंधरा दिसतो तर चांदणे पडल्यावर सोन्यासारखा दिसतो. पण आग्रा शहरातील वाढत्या प्रदूषनामुळे ताजमहाल चा रंग पिवळा होत आहे.

१०) लहान-मोठा दिसणारा ताजमहाल

आपण जस-जसे ताजमहाल पासून जवळ-दूर जातो तसा ताजमहालचा आकार लहान-मोठा होतो. ताजमहाल बांधणार्‍या कारागिरांनी केलेले हे एक ऑप्टिकल इल्युजन.