मृत्यूनंतर का लोक लवकरात लवकर प्रेत जाळून टाकायला बघतात ? कारण जाणल्यावर धक्काच बसेल.!

4618

जर कोणाचा मृत्यू झाला तर लोक नेहमी ही घाई करतात कि लवकरात लवकर त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जावेत. विशेष परिस्थिती वगळता लोक हे काम लवकर संपवायला बघतात. पण ही घाई मृताच्या नातेवाईकांपेक्षा जास्त आजू बाजूच्यांना असते हे तुम्हीही पहिले असेल. ही घाई का असते? यात वेळ का घालवायचा नसतो ? यामागे काही कारण असेलच. चला पाहूया वेळेत अंतिम संस्कारांचे महत्व. गरुड पुराणात असे म्हटले आहे कि जोपर्यंत गाव किंवा विभागात कोणाचे प्रेत असते तोपर्यंत घरात पूजा करू नये.

एवढेच नाही तर गरुडपुराणानुसार लोक आपल्या घरातील चूलही पेटवू शकत नाहीत. या परिस्थितीत कोणतेही शुभकार्यही करता येत नाही, किंवा व्यक्ती आंघोळही करू शकत नाही. जोपर्यंत प्रेत असते तोपर्यंत बाकीच्या लोकांची महत्वाची कामे अडून राहतात. म्हणून लोक अंतिम संस्कार लवकर करू पाहतात. जोवर अंतिम संस्कार होत नाहीत तोवर मृताच्या शरीराची काळजीही घ्यावी लागते कारण जर कुठल्या प्राण्याने प्रेताला स्पर्श केल्यास त्याला दुर्गती होते. अंतिम संस्कार वेळेत केल्याचा फायदा मृत व त्याच्या घरच्यांनाही होतो. पापी व्यक्तीचे नीट अंतिमसंस्कार केल्यावर त्याची दुर्गती होत नाही. मेल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. जाळण्याआधी घर आणि रस्त्यात पिंड दान केल्याने देवता- पिशाच खुश होतात आणि प्रेत अग्नीत सामावण्यास तयार होते. जाळताना प्रेताचे हात पाय बांधतात कारण शरीरावर पिशाच्चाने ताबा घेऊ नये. प्रेत जाळताना नेहमी चंदन आणि तुळशीच्या काड्यांचा वापर केला पाहिजे, या काड्या शुभ असतात आणि आत्म्याला दुर्गतीपासून वाचवतात.

सनातन धर्मात माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत सोळा संस्कार सांगितले आहेत. सोळावा संस्कार यातला सगळ्यात शेवटचा ज्याला अंतिम संस्कारही म्हटले जाते.या सोळाव्या संस्कारात व्यक्तीचा अखेरचा निरोप, दहन विधींपासून घराच्या पुनर्शुद्धीपर्यंत केले जाणारे सगळे विधी यात समाविष्ट होतात. गरुड पुराणात व्यक्तीच्या अंतिम संस्कारासंबंधी अनेक गोष्टी अशा सांगितल्या गेल्या आहेत ज्याचे पालन केल्यानंतर मृतात्म्यास शांती मिळते व त्याचा पुढच्या जन्माचा मार्ग मोकळा होतो. दहन संस्कारावेळी एक भोक असलेल्या घड्यात पाणी भरून चितेवर ठेवलेल्या शवाची परिक्रमा केली जाते आणि शेवटी मागच्या बाजूस घडा आपटून फोडला जातो. यांमुळे मृत व्यक्तीला शरीराशी मोह राहत नाही. या क्रियेत अजून एक रहस्य लपलेले आहे, जीवन हे एक भोक असलेल्या घड्यासारखे आहे ज्यात आयुष्यरुपी पाणी सतत टपकत असते आणि शेवटी जीवात्मा सगळे काही सोडून निघून जातो आणि जीवन समाप्त होते.