भारतातील या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी मोजावे लागतात तब्बल ४८ लाख रुपये

2731
Raj-Palace-Hotel

ज्या व्यक्तीकडे जितके पैसे तितक्याच सुखसोयी, आरामदायक आयुष्य शोधण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करत असतो. सध्याच्या काळात आपण घरातून बाहेर फिरण्यासाठी निघतो त्यावेळी आपल्या बजेटनुसार हॉटेलमधील रुम बुक करतो. कोट्याधीश लोकही आपल्या बजेटनुसार हॉटेल निवडतात. आपण ज्यावेळी एखाद्या हॉटेलमध्ये रुम बुक करतो त्यावेळी त्याचे भाडे ५०० रुपये ते १००० रुपये फारफार तर ५००० रुपये असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका हॉटेलसंदर्भात सांगणार आहोत ज्याचं एका दिवसाचं भाडे तब्बल ४८ लाख रुपये आहे.

राजस्थान आपली संस्कृती, प्राचीनकालीन महल आणि किल्ल्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. याच राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये राजपॅलेस हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये असं एक सुइट आहे ज्या ठिकाणी एक रात्री थांबण्यासाठी तब्बल ४८ लाख रुपये खर्च करावे लागतात.

एका हिंदी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलमधील सर्वात आलीशान आणि महाग सुइटमध्ये चार अपार्टमेंट बनविण्यात आले आहेत. यामधील बाथरुममध्ये फरारी कंपनीतर्फे सोन्याचे खास नळ बसविण्यात आले आहेत. तसेच अपार्टमेंटमधील सजावट सर्वांचीच मनं जिंकत.

या सुइटमध्ये तुम्ही ज्यावेळी फिराल त्यावेळी तुम्हाला एक वेगळाच फिल येईल. या हॉटेलला आपल्या सजावट आणि सुखसुविधा दिल्याबद्दल २०१२ साली बेस्ट लिडिंगचा अवॉर्ड मिळाला आहे. अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये राहण्याचा विचार असेच व्यक्ती करु शकतात ज्यांची कमाई करोडो आणि अरबो रुपये आहे.

Comments

comments