तुमचे नाव ‘S’ पासून सुरु होते? किंवा ‘S’ नावाची व्यक्ती तुमच्या जवळची आहे ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.!

5543

इंग्रजीतले एकोणिसावे अक्षर S आहे. प्रत्येक अक्षराच्या व्यक्तीमध्ये काही ना काही गुण किंवा दोष नक्कीच असतात. आज आपण त्या गुणदोषांबद्दल बोलणार आहोत.जर आपले नाव S अक्षरापासून सुरू होते किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचे नाव S वरून सुरू होते , तर खाली लिहिलेल्या बिंदूंना वाचून तुम्ही त्यांना आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांच्याकडे व्यावहारिक ज्ञान देखील आहे. याचा अर्थ ते कोणत्याही व्यक्तीशी खूप चांगलं नातं व मैत्री राखू शकतात व त्यांना कोणाशी कसे वागायचे हे बरोबर माहित असते. हे लोक खूप परिश्रम करतात. ते कोणत्याही गोष्टीपासून घाबरत नाहीत व जिद्दीने कोणतेही कार्य तडीस नेतात. ह्या व्यक्ती इतक्या बोलण्याच्या बाबतीत इतक्या धनाढ्य असतात की समोरची व्यक्ती आपसूकच त्यांच्याकडे आकर्षित होते. कोणत्याही व्यक्तीला हे आपल्या वाक्चातुर्याने आपलंसं करून घेतात आणि त्यांना आपल्या नियंत्रणातही ठेवतात. जिथून कुठून ज्ञान मिळवता येईल तिथून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही प्रकारचे ज्ञान शिकण्यापासून हे मागे हटत नाहीत व कोणतेही नवीन काम करण्यास घाबरत नाहीत.

S  नावाचे लोक फार प्रभावी असतात. हे सहजपणे कोणालाही प्रभावित करून घेतात. S नावाच्या लोकांचे मन निर्मळ असते. ते कोणापासूनही काहीही लपवत नाहीत. परंतु त्यांचा राग त्यांना इतर लोकांच्या नजरेत वाईट ठरवतो कारण ते रागात असतानाही सत्यच बोलतात. सत्य आणि आपल्या तत्त्वांसाठी, ते कोणाशीही सामना करण्यास तयार होतात. ते कोणालाही घाबरत नाहीत किंवा कोणापासून लाजतही नाहीत. यांना सत्याची कास धरण्यास आवडते. ते स्वत: ला कोणत्याही परिस्थितीत श्रेष्ठ सिद्ध करू इच्छितात.

सामाजिक जीवनात हे  हसतमुख व दिलखुलास असतात. हे लोक खूप सर्जनशील असतात. कोणतेही काम स्वतःच्या पद्धतीने करण्यास त्यांना आवडते. ते कोणाच्याही बोलण्यात न येता नेहमी स्वतःच्या मनाचंच ऐकतात. त्यांना जमावाबरोबर चालणे आवडत नाही. हे लोक कोणत्याही परिस्थितीला अगदी व्यवस्थित हाताळतात. त्यांना त्यांची गोष्टी सामायिक करणे आवडत नाही.हे मनाने वाईट नसतात, फक्त जे काही आहे मनात ते खरं खरं सांगून टाकतात. S नावाच्या व्यक्ती  प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात, ते मनापासून प्रेम करतात. हे लोक प्रेमात पुढाकार घेण्याआधी फार विचार करतात.

विवाहित जीवनात ते आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या जोडीदाराला वर्चस्वाखाली ठेवू पाहतात ज्यामुळे वैवाहिक जीवनात ताळमेळ नसतो. हे महिलांसाठी अधिक लागू आहे. विवाह झाल्यानंतर, एस नावाच्या  महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, तर लग्नानंतर पुरुष जीवन अधिक सुखी बनते.