रिक्षाड्रायव्हर एका बाजूला बसूनच रिक्षा का चालवतात ? घ्या जाणून..!

948

आपण जवळच्या प्रवासासाठी नेहमीच रिक्षाची मदत घेतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात तर रिक्षाशिवाय लोकांचे पानही हालत नाही. अशा या रिक्षाचा चालक ड्रायव्हरसीटवर नेहमी एकाच बाजूला बसून रिक्षा चालवताना दिसतो. तो असे का करतो याबाबत अनेकांना उत्सुकता असते. म्हणूनच घ्या जाणून…

–    रिक्षाचालक रिक्षा चालवण्यास शिकतो तेव्हा तो ड्रायव्हरच्या बाजूला बसूनच शिकतो. त्यामुळे एका बाजूला बसून रिक्षा चालवण्याची ही त्याची सवयच होऊन बसते.

–    रिक्षाचालकाच्या सीटकाली इंजिनही असते. त्यामुळे इंजिनमधून येणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कधी तो उजव्या बाजूला तर, कधी डाव्या बाजूला बसतो.

–    काही रिक्षाचालक आपल्या सिटवर प्रवाशांलाही बसवतात. त्यामुळे प्रवाशाला त्रास होऊ नये म्हणून, ड्रायव्हर एका बाजूला बसून रिक्षा चालवतात.

–    काही रिक्षा चालकांना मुळव्यादाचा त्रासही असतो. त्यामुळे वेदनेपासून मुक्ती मिळविण्यासाठीही काही रिक्षाचालक एका बाजूला बसतात.

–    रिक्षाची आसनव्यवस्ता ड्रायव्हरसाठी तितकी कंपर्टेबल नसते. त्यामुळे कंटाळा घालविण्यासाठिही रिक्षाचालक एका बाजूला बसतात.

–    रिक्षा सुरू करण्याचा दांडा डाव्या बाजूला असतो. अनेकदा इंधन वाचविण्यासाठी प्रत्येक सिग्नलवरती रिक्षा बंद करण्याची अनेक रिक्षाचालकांना सवय असते. त्यामुळे बंद केलेली रिक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी जास्त वेळ लागू नये. तसेच, ट्रॅफिकही होऊ नये या कारणासाठीही रिक्षावाले एका बाजूला बसतात.