हनीमूनसाठी भारतातील १० सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

10019

लग्न झाल्या झाल्या सर्वांनाच उत्सुकता असते ती पहिल्या वहिल्या हनीमूनची….प्रत्येक कपल आपल्या हनीमूनबद्दल अनेक स्वप्न रंगवत असतात. हनीमूनला नेमकं कुठं जायचं असा प्रश्न अनेकांना पडला असतो. तशी तर अनेकांना परदेशात जाण्याची इच्छा असते पण सर्वसामान्य कपल्ससाठी भारतातच काही खास हनीमून डेस्टीनेशन्स आहेत. या ठिकाणावरही तुम्ही धमाल-मस्ती करू शकता. आणि तुमचा पहिलाच हनीमून तुम्ही नेहमीसाठी यादगार करू शकता. असेच काही १० डेस्टीनेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१०) डलहौजी:

हिमाचल प्रदेशातील डलहौजीमध्ये हिरवेगार डोंगर आणि बर्फाने झाकलेले डोंगर या ठिकाणाला हनीमूनसाठी परफेक्ट जागा आहे. यासोबत येथील रोलिंग हिल्स आणि शांत डोंगरद-या लग्नानंतरचं लाईफ सुरू करण्यासाठी एक चांगलं डेस्टीनेशन मानलं जातं. डलहौजी हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील चंबा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे थंड हवेचे ठिकाणही आहे. हे शहर इंग्रजांनी वसवलेलं आहे.

९) श्रीनगर:

जन्नत म्हटल्या जाणा-या श्रीनगरला भारतातील सर्वात रोमॅंटिक डेस्टीनेशन मानलं जातं. इथली डल लेक आणि शालीमार बाग, निशत बाग्सारखे शानदार-सुंदर गार्डन तुम्हाला अतिशय वेगळा अनुभव देतात. यासोबतच इथे कपल्स गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगम या ठिकाणांनाही प्राध्यान्य देतात.

8.उदयपुर

राजस्थानमधील हे शहर सिटी ऑफ लेक्स नावाने लोकप्रिय आहे. या शहराला ईस्टमधील वेनिसही म्हटलं जातं. भारतातील सर्वात रोमॅंटीक ठिकाणांपैकी हे एक शहर मानलं जातं. अरावलीच्या डोंगराशी जुळलेल्या येथील लेक आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. येथील ताज लेक पलेस हिरिटेज हॉटेलही लोकप्रिय आहे. मे आणि जून महिन्यात लग्न करणा-यांसाठी ही जागा परफेक्ट आहे.

7.माउंट आबू

राजस्थानच्या वाळवंटात असलेलं एकुलतं एक हिल स्टेशन नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे. हे ठिकाणी गुजरात आणि राजस्थानच्या मधात आहे. येथील डोंगर आणि सुंदर व्ह्यू हनीमून परफेक्ट करतात. विकेंड्सला गुजरात, राजस्थान आणि दिल्लीवरून मोठ्या संख्येने लोक येथे येतात.

6.मुन्नार

येथील नैसर्गिक सुंदरतेमुळे या जागेला साऊथमधील रत्नही म्हटलं जातं. केरळमधील मुन्नारमध्ये असलेले चहाचे बगीचे या जागेला एक परफेक्ट हनीमून डेस्टीनेशन बनवतात. थंडी स्वच्छ हवा आणि धुक्याने येथील वातावरण तुमचं मन प्रसन्न करतं. कपल्सला हे ठिकाण अधिक आवडतं. हिवाळ्यात तर इथे एकदा नक्की भेट द्यायला हवी.

5.अलप्पा

केरळमध्ये दिवसभर चालणा-या या हाऊसबोटवर एखाद्या हॉटेलच्या रूमसारखी सेवा दिली जाते. इथे कपल्स पाण्यात आपला दिवस घालवू शकतात. ही बोट जंगलात तयार झालेल्या कॅनोलमधून जाते. ज्यामुळे कपल्स स्व:ताला निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव घेऊ शकतात. यासोबत इथे असलेले हेरिटेज मेंशन आणि वेअर हाऊस या ठिकाणाला परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात.

4.लद्दाख

हे ठिकाण नेहमीच प्रत्येकासाठी आकर्षण राहिलं आहे. या ठिकाणाला लॅंड ऑफ लामा आणि लिटिल तिब्बत असेही म्हटले जाते. येथील डोंगरातील रस्ते, द-या फार रोमॅंटिक आहेत. पण आरोग्यची समस्या असलेल्या लोकांना इथे येण्याआधी हेल्थ चेकअप करावे लागेल. कारण इथे उंच डोंगरात श्वास घेण्यास त्रास होतो.

3.कसौनी

कसौनी दिल्लीजवळ असलेलं सर्वात लोकप्रिय हनीमून डेस्टीनेशन आहे. उत्तराखंडमधील ही जागा हनीमूनसाठी देशभरात लोकप्रिय आहे. नैनीताल आणि अल्मोडा जाणा-या कपल्सनी इथे नक्की जावं.

2.मनाली

हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिमाचलमधील मनालीत प्रत्येक सीझनमध्ये जबरदस्त वातावरण असतं. हनीमूनसाठी ही जागा सर्वात चांगला पर्याय आहे. बर्फांच्या डोंगरातून निघणारी नदी या जागेला अतिशय सुंदर बनवते. यासोबतच इथे राफ्टिंगसोबत ट्रेकिंग आणि स्किईंगचाही आनंद घेता येतो.

1.शिमला

हनीमूनसाठी शिमला नॉर्थ इंडियातील सर्वात लोकप्रिय जागा आहे. शिमलाला क्वीन ऑफ हिल्स या नावानेही ओळखलं जातं. येथील बर्फांचे डोंगर आणि शांत वातावरण या जागेला परफेक्ट हनीमून डेस्टीनेशन बनवतात. यासोबतच स्किईंग आणि स्केटींगचाही आनंद घेता येतो. इथे कोणत्याही वातावरणात तुम्ही जाऊ शकता.

Comments

comments