लोक लेफ्टी का असतात? जाणून घ्या कारण…..

764

जगभरात भलेही लेफ्टी लोकांची संख्या कमी असो पण जितकेही डाव्या हाताने काम करणारे लोक आहेत ते विद्वान समजले जातात. किंवा त्यांच्याकडे एक विशिष्ट गुण असतो. पण लेफ्टी किंवा मराठी डकना असण्याचं काय कारण आहे.यावर एक रिसर्च केला गेला आहे. त्यात याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

left-handed writting the text I am left-handed

का असतात लोक लेफ्टी:
लेफ्टी असण्याच्या कारणावर आतापर्यंत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. पण त्यावर एकमत झालेलं नाहीये. तरीही काही असे रिसर्च आहेत ज्यातून हे कळालं की, मानवी शरिरातील जीन्समुळे आणि डिएनएमुळे लोक डाव्या हाताचा वापर करतात. सहा महिन्याच्या वयापासून नवजात बालक डाव्या किंवा उजव्या हाताचा वापर सुरू करतात आणि तिच पुढे जाऊन सवय होत. कधी कधी असेही मानले जाते की, असे जेनेटिक कारणांमुळे होते. जर आई-वडील लेफ्टी असेल तर काही प्रमाणात अशीही शक्यता असते की, मुलंही लेफ्टी होऊ शकतात.

जगभरात १० टक्के आहे लेफ्टी लोक

थंडीमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान जन्म घेणारे मुलांमध्ये लेफ्टी होण्याची शक्यता अधिक असते. एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. दररोजच्या जीवन महत्वाची सगळीच कामे करण्यासाठी उजव्या हाताचा वापर होतो. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नाच्या उलरिच, स्टीगर आणि मार्टिन वोरासेक यांनी यावर अध्ययन केलं आहे. त्यांनी त्यांच्या अध्ययनात ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या १३ हजार लोकांना सहभागी करून घेतले होते. यातून ७.५ टक्के महिला आणि ८.८ टक्के पुरुष डाव्या हाताने काम करण्यात पटाईत आहे.

रिसर्चचे मुख्य लेखक उलरिच तरान यांनी सांगितले की, आम्हाला आढळलं की, डाव्या हाताने काम करणा-या अनेक पुरुषांचा जन्म नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान झाला आहे. जगभरात लेफ्टी असलेले अनेक लोक हे विद्वान असल्याचे बघायला मिळतात. तसे लेफ्टी असणं काही चुकीचं नाहीये. पण लोक लेफ्टी का असतात याचं उत्तर मिळवण्यात अनेकांना उत्सुकता असते. आणि याचं योग्य उत्तर अनेकांना माहिती नसतं.